शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माता जगदंबाच्या दर्शनासाठी देवगावला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:27 IST

देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्दे येवला तालुक्यातील मुखेड येथील शिवमंदिरात थांबून भोलेनाथची पूजा केली. तेथून विश्रांतीसाठी देवगाव येथील रमणीय स्थळी थांबली. येथून आकाशामार्गे देवीने लोणजाई डोंगराकडे प्रयाण केल्याचे देवी पुराणामध्ये नमूद आहे. येथे प्रत्येक नवरात्रोत्सवात घटी बसणाऱ्यांच्या

देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.देवगाव जेव्हा नावारूपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे हे गृहस्थ येथे वास्तव्यास आले. येताना त्यांनी माहूरगडावरून तुळजाभवानी मातेचा तांदळासोबत आणला होता. तिची प्रतिष्ठापना करून येथे मंदिर उभारले. दैत्याचा वध करून देवी जात होती तेव्हा त्रिशुळाला लागलेल्या रक्ताचा थेंब ज्या जागेवर पडला त्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले अशी आख्यायिका आहे. देवीपुराणामध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथे गोदावरी नदीतीरावर जगदंबेने आंघोळ केली.मंदिराच्या सभोवती जनार्दन स्वामी मंदिर, भक्तनिवास, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, डी.आर. भोसले विद्यालय असल्याने परिसर दिवसभर गजबजलेला असतो. नवरात्रोत्साहात रात्रभर वाघे देवीची महती गात जागरण करतात. महिलावर्ग देवीची खणानारळाने ओटी भरून नवस फेडतात. उत्सवानिमित्त भवानीनगरातील युवकांनी मंदिर परिसरात साफसफाई करून विद्युत रोषणाईने सुशोभित केले आहे. तीस वर्षांपासून देवीभक्त बाळासाहेब गुरव हे देवी मंदिर व परिसराची देखभाल करतात. (12देवगाव माता)