शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:49 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत चारही सभापतिपदांवर विजय मिळविला, तर भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या सुरेखा दराडे, सुशीला मेंगाळ, तर राष्टÑवादीचे संजय बनकर व कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर या चौघांची सभापतिपदी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिवसेनेच्या दराडे, मेंगाळ; राष्टÑवादीचे बनकर, कॉँग्रेसच्या आहेर विजयी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत चारही सभापतिपदांवर विजय मिळविला, तर भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या सुरेखा दराडे, सुशीला मेंगाळ, तर राष्टÑवादीचे संजय बनकर व कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर या चौघांची सभापतिपदी निवड करण्यात आली.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली असली तरी, विषय समित्यांच्या वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव निर्माण झाला. विषय समित्यांचे वाटप कसे करावे याबरोबरच प्रत्येक पक्षातील इच्छुकांना थांबविण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावीलागली.शिवसेना दोन समित्यांवर व त्यातही महत्त्वाच्या समित्यांवर अडून बसल्याने राष्टÑवादीनेही तितक्याच तीव्रतेने त्यास विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण होऊन राष्टÑवादीने थेट भारतीय जनता पक्षाशी बोलणी सुरू केल्याने सेनेने नमते घेतले. परिणामी महाविकास आघाडी एकसंध राहू शकली.या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन सदस्य गैरहजर राहिले तर माकपाच्या एका सदस्याने तटस्थ राहत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीत फाटाफूट होण्याच्या शक्यतेने भाजपने गुप्त मतदानाचा आग्रह धरला तो पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.दुपारी १२ वाजता विशेष सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व दोन विषय समिती सभापतिपदासाठी नामांकन दाखल करण्यात आले. त्यात प्रत्येक सभापतिपदासाठी भाजप व माकपाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यामुळे तिरंगी उमेदवार रिंगणात राहिल्याने अर्ज छाननीनंतर पीठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला.समाज कल्याण सभापतिपदी मेंगाळसमाज कल्याण समितीच्या सभापतिपदासाठी माकपाच्या अनिता बोडके, भाजपच्या आशा जगताप व शिवसेनेच्या सुशीला मेंगाळ या तिघांनी नामांकन अर्ज दाखल केले. अर्ज माघारीत अनिता बोडके यांनी माघार घेतल्याने सरळ सरळ लढत होऊन त्यात सेनेच्या सुशीला काशीनाथ मेंगाळ यांना ५३ मते मिळाली, तर भाजपच्या आशा जगताप यांना १५ मते मिळाली. माकपाचे रमेश बरफ हे तटस्थ राहिले, तर अनिता बोडके यांनी मतदान केले नाही. त्यामुळे सुशीला मेंगाळ विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही घोषणा होताच सत्ताधारी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.बांधकाम राष्टÑवादी, तर शिक्षण खाते शिवसेनेकडेदोन विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे संजय बनकर व शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांची निवड करण्यात आली असली व त्यांच्या खात्यांचे वाटप झाले नसले तरी, महाविकास आघाडीत झालेल्या समझौत्यानुसार संजय बनकर यांच्याकडे बांधकाम खाते, तर सुरेखा दराडे यांच्याकडे शिक्षण व आरोग्य सभापतिपद देण्यात येणार आहे. उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर सेनेच्या सुशीला मेंगाळ यांच्याकडे समाज कल्याण, कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर यांच्याकडे महिला व बाल कल्याण समिती देण्यात आली आहे.गुप्त मतदानाची मागणी फेटाळलीसभागृहाचे कामकाज सुरू होताच, भारतीय जनता पक्षाच्या पंधरा सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आत्माराम कुंभार्डे यांनी पिठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोपवून या निवडणुकीत अनेक सदस्यांना गोपनीय मतदान करावयाचे असल्याने विषय समिती सभापतिपदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगून पिठासीन अधिकाऱ्यांनी सदरची मागणी फेटाळून हात उंचावून मतदान होणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद