शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बागलाणमधील विकासकामे; भाजपच्या प्रभावाचा करिष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:40 IST

बागलाण विधानसभा मतदारसंघात  भाजपचा प्रभाव असल्यामुळे बागलाणचे भूमिपुत्र प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४मध्ये डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठविले.

बागलाण विधानसभा मतदारसंघात  भाजपचा प्रभाव असल्यामुळे बागलाणचे भूमिपुत्र प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४मध्ये डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठविले. या निवडणुकीतदेखील मोदी फॅक्टरनेच चमत्कार केल्याचे दिसून आले. बागलाणमध्ये डॉ. भामरे यांनी पाच वर्षात सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न, सटाणा शहरासाठी संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना या भरीव कामांबरोबरच तालुक्याच्या जनतेशी असलेला जनसंपर्क याचादेखील मोठा प्रभाव राहिला आहे.बागलाण तसा काँग्रेसच्या विचारांबरोबर राहिला आहे. परंतु १९९५मध्ये राज्यातील भाजप-सेना युतीच्या काळात या भागातील भूमिपुत्र माजी आरोग्यमंत्री डॉ.दौलतराव आहेर यांनी मविप्र आणि वसाका या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली होती. या दोन्ही संस्था डॉ. आहेर यांची शक्तिस्थाने ठरली. या माध्यमातून बागलाणशी चांगला संपर्क आला. त्यावेळचे अपक्ष आमदार दिलीप बोरसे यांना सोबत घेऊन हरणबारी डावा आणि उजवा कालवा मंजूर करून कामालादेखील सुरुवात केली. या कामांमुळे डॉ. आहेर यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे बागलाणने भाजपला शंकर अहिरे, उमाजी बोरसे यांच्या रूपाने दोन आमदार दिलेत.सुरुवातीला कॉँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने मराठा मतांचे विभाजन होऊन मुस्लीम व्होट बँक पाटील यांना तारेल असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात होते. मात्र मालेगाव मध्यमध्ये पाटील यांनी हिंदू राष्ट्राच्या लावलेल्या फलकांवरून केलेल्या आततायीपणाच्या प्रचारामुळे अखेरच्या टप्प्यात या निवडणुकीला जातीयतेचा रंग प्राप्त. झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच मोदींच्या सुप्त लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाल्याचे बघायला मिळाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे