शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

कळवण शहरातील विकासकामेही कोरोनाच्या संकटामुळे ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:36 IST

कळवण : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम सार्याच घटकांवर झाला आहे. त्यातून कळवण शहरातील विकासकामांचीही सुटका झालेली नाही. 22 कामे कोरोनामुळे लागलेल्या संचरबंदीमुळे ठप्प झाली आहेत.

कळवण : (मनोज देवरे) कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम सार्याच घटकांवर झाला आहे. त्यातून कळवण शहरातील विकासकामांचीही सुटका झालेली नाही. 22 कामे कोरोनामुळे लागलेल्या संचरबंदीमुळे ठप्प झाली आहेत. मार्चअखेर नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करावयाची विकासकामे ’डाऊन’ झाली होती, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे सहा कामे सुरु झाली आहेत. तर शहरातील 16 कामे बंद असलेल्या कामांना लवकरच मुहूर्त लागणार आहे.नगरपंचायत अंतर्गत होणारी कर वसुली ठप्प झाली आहे. 65 लाखांहून अधिक थकबाकी असून नगरपंचायतवर दरवर्षी 22 लाखांहून अधिक रकमेचा भुर्दंड असमावेशीत कर्मचारी यांच्या पगारामुळे पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोन कोटींहून अधिक निधीच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. कळवण ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुरु वातीच्या काळात अनेक अडचणींना नगराध्यक्षासह गटनेते, नगरसेवक यांना तोंड द्यावे लागले. आमदार नितीन पवार यांच्या अधिपत्याखाली शासनाकडून नगरपंचायतीला विशेष निधी मिळाला आहे मात्र, तो कोरोनामुळे लालिफतीत अडकला आहे.-----------------------दररोजचे चलन थांबलेपगाराचा भुर्दंडलॉकडाऊनमुळे नगरपंचायतची करवसुली रखडली आहे.त्यामुळे सर्वच कर्मचार्यांचा पगार वेळेत करण्याचा यक्षप्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. नगरपंचाय्ंतीचे उत्पन्न स्त्रोत कमी असल्यामुळे कारभार हा शासनाच्या अनुदानावरच अवलंबून राहिला आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी व विकास करावरच विकासकामे अवलंबून आहेत. उत्पन्न घटल्याने अंदाजपत्रकाचा चढता आलेख आता खालावत चालला आहे. त्यामुळे निधीची चणचण नगरपंचायत समोर निर्माण झाली आहे. मिळकत करातून उत्पन्न मिळते. मात्र कोरोनामुळे कर वसुलीचे प्रमाण किती असणार याबाबत ठामपणे सांगता येणार नाही. व्यवहार बंद आहेत, रोजगार नाही, दररोजचे चलनच थांबले आहे. अशा स्थितीत कर वसुलीचा तगादा लावला तर सर्वसामान्यांतून उद्रेक होण्याचीच शक्यता जास्त आहे.----------------------४कळवण नगरपंचायतची बिकट आर्थिक स्थिती आणि अंदाजपत्रकानुसार होत नसलेली उद्दीष्टपूर्ती त्यामुळे नगरपंचायतच्या उत्पन्नाचा आलेख घसरत आहे.४कोरोनामुळे निर्माण होणार्या स्थितीमुळे नियोजित सर्व विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यताआहे. ग्रामपंचायतीत सेवेत असलेल्या 10 कर्मचार्यांचे समावेशन झाले आहे.४35 कर्मचाऱ्यांचे समावेशन नसल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भुर्दंड दरवर्षी बसत आहे. त्यामुळे नगरपंचायतीत त्यांचे समावेशन करणे गरजेचे आहे.----------------------१नगरपंचायतीला शासनाचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तोदेखील कोरोनामुळे अद्याप प्राप्त झालेला नाही. दलित वस्ती, दलितेतर विकास निधी, नगरोत्थान, रस्ता निधी या वेगवेगळ्या शिर्षकातून नगरपंचायतला आजपर्यंत 20 कोटीहून अधिक निधी मिळाला आहे. त्यातून शहर अंतर्गत सिमेंट काँक्र ीटचे रस्ते विकासकामांची साक्ष देत आहेत. शहरातील सर्वच भागात धुमधडाक्यात रस्त्याचे रु ंदीकरण, सुशोभीकरण, काँक्रि टीकरण, डांबरीकरण झाल्यामुळे परिसराचा ’लूक’ बदलला.२एकीकडे शहराचा विकास दिसत असला तरी शिवाजीनगर भागातील रस्त्याचे भाग्य मात्र अजून उजळले नाही. रस्त्याच्या रु ंदीकरणसह काँक्र ीटीकरण व गटारीचे काम मंजूर असल्याची वंदता आहे. गटनेते कौतिक पगार, नगराध्यक्षा रोहिणी महाले, उपनगराध्यक्ष अतुल पगार, मुख्याधिकारी सचिन माने यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या एकीचे हे बळ दिसते.३मात्र मुहूर्त लागत नाही व निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोरोनाच्या गर्तेत सापडलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त शोधावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.कोरोनाचे संकट कोसळल्यामुळे मजूर वर्ग गावाकडे निघून गेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रु पयांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये गटारी आणि रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. काही ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. बहुतांशी कामांचे इस्टिमेट व टेंडर प्रक्रि याही झाली तर काही थांबली आहेत.------------------शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली व विषय समित्यांचे वाटपही झाले. यामुळे जादा निधी उपलब्ध होईल, विकासाची कामे वेगाने होतील अशी अपेक्षा होती, पण सुरु वातीला तीन वर्षे विकासकामांसाठी निधीच मिळाला नाही. परिणामी विकास कामे ठप्प झाली. नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींना शहर विकासासाठी शासनाकडून विशेष विकास निधी दिला जातो. परंतु कळवण नगरपंचायतीला निधीवाटप करताना सापत्न वागणूक देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे 16 कामे बंद असून 6 कामे सुरु आहेत.- कौतिक पगार, गटनेते, नगरपंचायतकोरोनाचा संसर्ग मार्च मिहन्यात वाढू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने विविध उपाय योजना सुरू केल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपंचायतवर आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पोलीस, आरोग्य विभागाच्या बरोबरीने नगरपंचायत प्रशासन खांदयाला खांदा लावून काम करू लागले ; मात्र याचा परिणाम नगरपंचायतच्या कारभारावर झाला. मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेर. या महिन्यात नगरपंचायतची सरासरी 70 टक्के कर वसूल होतो. मात्र मार्च 2020 मध्ये नगरपंचायतची सर्व यंत्रणा कर वसुली ऐवजी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनात गुंतली. यामुळे कर वसुली झाली नाही.- सचिन माने, मुख्याधिकारी, नगरपंचायत

टॅग्स :Nashikनाशिक