मुंजवाड : केळझर धरणांच्या चारी क्र. आठचे काम दीपावलीनंतर लगेच सुरू करण्यात येणार असून, हरणबारी धरणाचा उजव्या कालव्याच्या पुढील कामासाठी पाठपुरावा सुरू असल्याने आमदार दीपिका चव्हाण यांनी बागलाण तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील व शैलेश सूर्यवंशी, पंचायत समिती उपसभापती वसंत भामरे, गटविकास अधिकारी सी.डी. बहिरम, पं.स.चे उपअभियंता काद्रीसाहेब, पं.स. सदस्य दिनेश धोंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना दीपिका चव्हाण म्हणाल्या, युतीचे शासन हे भरकटलेले शासन आहे. त्यांना कोणत्याच कामाचा अनुभव नसल्याने सर्व प्रकारची विकासकामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देणारे मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांचा कांदा पन्नास पैसे किलोने विकला जात असताना तरीही निर्णय घेत नाही.
बागलाण तालुक्यात विकासकामांना प्रारंभ
By admin | Updated: October 12, 2016 21:58 IST