शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधींवरील संशोधनातून आयुर्वेदाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:07 IST

मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

नाशिक : मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.  आयुर्वेदाचा भारतीय संस्कृतीशी थेट संबंध येतो. अ‍ॅलोपॅथीअगोदर आयुर्वेदानुसारच औषधोपचार केले जात होते. आयुर्वेदशास्त्राचे धडेदेखील महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातूनच गिरविले जातात. रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी नागरिकांकडून आजही आयुर्वेदावर विश्वास दाखविला जातो. आयुर्वेदाचा निसर्गाशी थेट संबंध असून, निसर्गामध्ये आढळणाऱ्या वनौषधींवर आयुर्वेदाचा औषधोपचार अवलंबून आहे.  त्यामुळे दिवसेंदिवस आयुर्वेदामध्ये संशोधन वाढत असून, नैसर्गिकरीत्या वनौषधींचा गुणधर्म शोधून त्याआधारे गोळ्या, द्रव्यरुप औषधे बाजारात उपलब्ध झाली आहे. केवळ काढा, जडीबुटी, तेल यापुरतेच आयुर्वेद मर्यादित राहिलेले नाहीतर त्याहीपलीकडे आयुर्वेद गेले आहे. आयुर्वेदाकडे एक जीवनशैली म्हणून जर बघितले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, लठ्ठपणा, थॉयराईड यांसारख्या आजारांवरदेखील मात करणे सहज शक्य असल्याचा दावा शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ करतात. आयुर्वेद औषधोपचाराद्वारे रोगाचे समूळ उच्चाटन शक्य आहे. आयुर्वेदाचा प्रभाव हळूहळू होतो किंवा उशिराने गुण येतो, हा गैरसमज नागरिकांनी दूर करण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेदाचे दुष्परिणाम नाही, असे मुळीच नाही. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणामही असतात.- डॉ. प्रीती त्रिवेदी, एम.डीआयुर्वेदाची उपचारपद्धती दीर्घकालीन घ्यावी लागते हा गैरसमज दूर करावा. आयुर्वेदाच्या काही उपचार पद्धतीचे दुष्परिणामदेखील जाणवतात. आयुर्वेद उपचारपद्धती आजही तितकीच प्रभावशाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचार आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये संशोधनाला खूप वाव आहे; मात्र त्यास अधिक गती देण्याची गरज वाटते.  - डॉ. शीतल सुरजुसे, बी.ए.एम.एस

टॅग्स :medicinesऔषधंdoctorडॉक्टर