शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिक कौशल्ये विकसित करावी : पृथ्वीराज तौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:35 IST

चांदवड : आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, मराठी भाषिक कौशल्ये विकसित करणे, विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीची माहिती करून घेणे आणि मराठी भाषेची व्यवहारातील उपयुक्तता आणि वैशिष्ट्ये यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातील व्यासंगी प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.

ठळक मुद्दे चांदवड मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

चांदवड येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत व्याख्यानमालेचे बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी. एच.जैन हे होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या हस्ते झाले. यावेळी मलोसे यांनी आपण प्रत्यक्ष व्यवहारात कशा प्रकारे मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरतो त्याचे उदाहरणासह स्पष्टीकरण केले. पृथ्वीराज तौर यांनी बीजभाषणातून मराठी भाषेची कौशल्य ही व्यवसायाच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतात याचे विवेचन केले. दररोज निरनिराळ्या प्रश्नांना आणि समस्यांना घेऊन आपल्यासमोर उभे राहत आहे. हे प्रश्न केवळ सामाजिक अथवा आर्थिक नाहीत तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापणारे असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.जी. एच. जैन यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व संयोजक डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश आहेर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण