सटाणा : शहरातील ग्रामदैवत संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या १८२ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवार (दि. ५) पासून यात्रोत्सवास विविध कार्यक्र मांनी प्रारंभ होणार असल्याची माहिती तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली.यशवंतराव महाराज यात्रोत्सवा निमित्त ५ ते ९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, नेहा पोतदार, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपासून रथ मिरवणूक, रात्री ११ वाजता कीर्तनाचा कार्यक्र म होईल. ६ ते ९ जानेवारी दररोज भाविकांसाठी ट्रस्टतर्फे महाप्रसादाचा कार्यक्र म ठेवण्यात आला असून, ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपासून आरम नदीपात्रात कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ दहीकाला व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.(वार्ताहर)
आजपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव
By admin | Updated: January 4, 2016 23:02 IST