शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:47 IST

अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़

ठळक मुद्देअपघातावर नियंत्रण : बेफाम वाहनांना लागणार ब्रेक, जीवितहानी टळणार

पंचवटी : अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़ या ठिकाणच्या अपघातांवर नियंत्रणासाठी गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी लोकमतने उचलून धरली होती़ तसेच तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळा बनल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यातयेऊन त्याचा वारंवार पाठपुरावा केला होता.तारवालानगर चौफुलीवर बेफाम येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस व मनपा प्रशासनाकडे केली होती. या चौफुलीवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले होते़ या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली तरी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटेच्या वेळी भरधाव वाहन नेण्याच्या प्रयत्नात दुचाकी वा चारचाकी वाहने एकमेकांवर आदळून अपघाताच्या घटना घडल्याचे या ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या होत्या़ या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत काहींना हकनाक जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे.तारवालानगर चौफुलीवर प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली असली तरी दिवसा वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसायचे़ मात्र वाहतूक पोलिसांची पाठ फिरताच वाहनचालक उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा