शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारेरोडवरील दशक्रियाविधी शेडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:12 IST

गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गंगापूरगाव : गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.गिरणारे दुगाव तसेच पंचक्रोशितील नागरिक याठिकाणी दशक्रि या विधीसाठी येत असतात. त्यांना विधिवत कार्यक्र मासाठी चांगली जागा म्हणून गोदावरी नदीवरील पुलाखाली शासनाच्या वतीने आमदार- खासदार निधीमधून दशक्रि या शेडची निर्मिती केली जाते, मात्र शासनाच्या गुणनियंत्रण विभाग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्याचे प्रमाणपत्र सढळ हाताने दिले जात असल्याचे या दशक्रि या शेडची अवस्था बघून वाटते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे हे शेड जेव्हा बांधण्यात आले, त्याच्या दोन-तीन महिन्याने शेडचे वरचे पत्रे उडून गेले, त्यानंतर ते पत्रे संबंधित ठेकेदाराने बसविल्यानंतर काही महिन्याने शेडच्या पायाखालची वाळू सरकून जमिनीत काँक्रीट असतानाही मोठे भगदाड पडले. कोट्यवधी रु पये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी तशेच काम पूर्णत्वाचा दाखला देणारे सर्व अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल गिरणारे आणि दुगावमधील नागरिकांनी केला आहे.यासंदर्भात गिरणारे गटाच्या अर्पणा खोसकर यांच्याशी पत्रव्यवहार झाले असून, निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यावर अजून चांगल्याप्रमाणे काम करण्याचे त्यांनी सांगितले आहे. याठिकाणी गिरणारे, दुगाव, नाईकवाडी, साडगाव नागलवाडी, आभाळेवाडी आदी भागांतील नागरिक येथे दशक्रि याविधीसाठी येतात. महिलांसाठी किंवा पुरु षांसाठी कपडे बदलण्याची रूम, पाणीची वेवस्था, लाइट तसेच महिला-पुरु षांसाठी शौचालायची व्यवस्था आदी सर्व सुविधा देणार आहे.- अनिल थेटे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nashikनाशिक