शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तोतया ट्रॉफिक पोलीस आला अन् जीप घेऊन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:54 IST

सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली.

सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली. चक्क वाहतूक पोलीसाचा ड्रेस घालून वाहनचालकला फसवून त्याची जीप पळवून नेण्याच्या प्रकार दिवसाढवळ्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने पोलीस यंत्रणाही कोड्यात पडली आहे.त्याचे झाले असे... इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील दत्तू पांडुरंग कुंदे (४२) हे बहिणीला सोडण्यासाठी सिन्नर येथे बोलेरो जीप (क्र. एम. एच. १५ इ. पी. २५७३) घेऊन आले होते. बहिणीला सोडल्यानंतर ते परतीला निघाले होते. परत जात असतांना कुंदे यांना सिन्नर शहरातील मध्यवर्ती भागात गावठा येथे मारुती मंदिरासमोर मित्र भेटला. त्यामुळे कुंदे यांनी सिन्नर-घोटी रस्त्याच्या कडेला जीप उभी करुन मित्रासोबत गप्पा मारत थांबले. याचवेळी ट्रॉफिक पोलिसाचा वेष परिधान केलेली व्यक्ती दुचाकीहून येऊन त्यांच्याजवळ उभी राहिली. अंगात सफेद शर्ट, खाकी पॅँट, काळे बूट व अंगावर निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या या व्यक्तीने माझी नव्याने येथे बदली झाली असल्याचे सांगितले. ‘तुला साहेबांनी बोलवले आहे. गाडीची चावी दे’ असे सांगून या तोतया वाहतूक पोलिसाने चालक कुंदे यांच्याकडून बोलेरो गाडीची चावी घेतली.सोबत आणलेली स्प्लेंडर दुचाकी तेथेच ठेवून हे महाशय बोलरो जीप मध्ये ऐटीत बसले. स्वत:च्या हातात स्ट्रेअरिंग घेऊन या तोतया ट्रॉफिक पोलीसाने कुंदे याची जीप घोटी रस्त्याकडे सुसाट नेली. चालक कुंदे हे स्तब्ध होऊन पाहात राहिले. तोतया ट्रॉफिक पोलिसाची दुचाकी जागेवरच असल्याने त्यांना सुरुवातीला संशय आला नाही. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही बोलेरो जीप वळून पुन्हा माघारी न आल्याने कुंदे यांनी मालकासोबत संपर्क साधून आपबिती सांगितली. दोन दिवस परिसरात जीपचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आपल्याला फसवून जीप पळवून नेल्याची तक्रार कुंदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे.याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर दुचाकी ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ, आर. बी. भागवत, दीपक शार्दूल अधिक तपास करीत आहेत.चौकट- दुचाकीही चोरीचीसदर तोतया ट्रॉफिक पोलिसाने सोबत आणलेली दुचाकी घटनास्थळी मिळाली. पोलिसांनी या दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर सदर दुचाकी नाशिक येथून चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे या तोतया पोलिसाने बोलेरो जीप पळवून नेण्यासाठी वापरलेली दुचाकीही चोरीचे समोर आले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस