शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास

By admin | Updated: May 13, 2015 01:25 IST

घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास

नाशिक : गेल्या महिन्यात गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या एक हजार क्युसेस पाण्याच्या विसर्गातच कुंभमेळ्यासाठी विस्तारीकरण करण्यात आलेला घाट बुडाल्याने प्रत्यक्षात पावसाळ्यात गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी व गोदावरीला येऊन मिळणाऱ्या अन्य नद्या, नाल्यांचा विसर्ग पाहता, घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिल्या. घाट विकासाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त करतानाच या घाटाला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांबाबतही पाटबंधारे खात्याच्या चालढकलाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. भाविकांची रामकुंडावर स्नानासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी घाट विकसित करण्यात येत असून, कुंभमेळ्याच्या काळात गंगापूर धरणातून सुटणारे पाणी व पावसाळ्याच्या पाण्यात या घाटाचा कितपत उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने मंगळवारच्या कुंभमेळा आढावा बैठकीत आपले सादरीकरण केले. मात्र त्यांनी केलेले सादरीकरण व प्रत्यक्षात पावसाळ्यात घाटावर असणारे पाणी याचा ताळमेळ बसण्याबाबत शंका उपस्थित करण्यात येऊन त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घाटाच्या विस्तारीकरणाबरोबरच या घाटावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ये-जा करण्यासाठी अजूनही रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. पाटबंधारे खात्याच्या संथगतीमुळेच काम रखडल्याची भावना व्यक्त करण्यात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक बैठकीत कामे पूर्ण करण्याबाबत निव्वळ आश्वासने दिली जातात, परंतु पूर्तता होत नसल्याने आता ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचनाही देण्यात आल्या. रेल्वेने पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करावी यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. कुंभमेळ्याच्या काळात रेल्वे जागा आरक्षण बंद करून त्याऐवजी अधिकचे डबे कसे जोडता येतील याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साधुग्राम परिसरात खाद्यपदार्थ व भाजीपाला स्टॉलसाठी व्यवस्था करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आली. या बैठकीस महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगनाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)