शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून वेली पिके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:38 IST

दिंडोरी/जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलामुळे वेली पिकावर व्हायरस रोग आल्याने वेली पिके नष्ट करण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शेतक-यांना लाखो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

दिंडोरी/जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलामुळे वेली पिकावर व्हायरस रोग आल्याने वेली पिके नष्ट करण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शेतक-यांना लाखो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.जानोरी परिसरात नगदी पीक म्हणून टोमॅटो, शिमला मिरची, वांगी, फ्लावर कोबी या पिकाबरोबरच वेली पिक म्हणून दोडका, भोपळा, गिलके, कारले, वालवड,वेली घेवडा आधी पीक केले जातात.परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे पिकांवर अनेक प्रकारचे रोग येऊ लागल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतकरºयांचा माल तयार करूनही विकता येत नाही. कधी लोकडाउन होते. व्यापारी संप करतात. कधी माल गाड्या वाले संप करतात. हमाल संप करतात. असे अनेक संकटे येऊन पण शेतकरी हार न मानता आपली शेती करत असतो. पण यावर्षी करोना महामारी रोगावर बरोबर पावसानेही दडी मारल्याने शेतकºयांना अनेक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .अनेक दिवसापासून पाऊस पडत नसल्याने या परिसरात पांढरी माशी, आळई, मिलीबग, तुडतुडे, असे अनेक प्रकारचे कीटक वाढले आहे. त्यामुळे वेली पिकच्या दोडका, भोपळा, कारले, गिलके, वेली घेवडा या पिकावर वायरस या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वेली पिकावर अनेक प्रकारचे औषधे फवारले असतानाही वेली पिक सुधरत नसल्याने शेतकरी नष्ट करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक