शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांप्रती समाजाची असंवेदना नष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:36 IST

दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देवायुनंदन : नॅबच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

सातपूर: दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले.सातपूर येथील नाईस सभागृहात आयोजित नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. वायुनंदन यांनी पुढे सांगितले की, समाजातील वंचित घटक आणि अपंग यांच्याविषयी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सहानुभूतीची गरज नाही, तर स्वाभिमानाने जगता यावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विशाखा संस्थेचे संचालक प्रकाश अतकरे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार अ‍ॅड. भागचंद चुडीवाल, गोपी मयूर, सूर्यभान साळुंखे, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना आणि राज्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक प्रा. यजुर्वेद महाजन तसेच गणेश गुप्ता, शंकर वानेरे, प्रा. विशाल कोरडेआदींनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार परीक्षक म्हणून डॉ. माणिक गिरीधारी, डॉ. सुनील कुटे, प्रा. सिंधू काकडे, प्रा.विजयकुमार पाईकराव यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन सुगंधा शुक्ल यांनी केले. प्रा.सिंधू काकडे यांनी आभार मानले.दिव्यांगांना मोफत शिक्षण देणारयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दिव्यांगांकडून शिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची ग्वाही कुलगुरू ई.वायुनंदन यांनी यावेळी दिली. तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक साधनसामुग्रीसाठीदेखील सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजानेदेखील त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्यास दिव्यांगांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असेही वायुनंदन यांनी सांगितले.असे आहेत पुरस्कारार्थीआदर्श प्राध्यापक पुरस्कार (अंध)-प्रा.विजय कोरडे, श्री शिवाजी कॉलेज, जिल्हा अकोला.४आदर्श शिक्षक (डोळस). शंकर भीमराव वानेरे. अंध निवासी विद्यालय, बुलढाणा. अंध शिक्षक : मनिराम परशराम चौधरी, रयत शिक्षण संस्था, साकोरे, ता.नांदगाव. डोळस शिक्षिका : सुनीता बाळासाहेब वढणे, नॅब अंध मुलींची शाळा, श्रीरामपूर;४आदर्श संस्था-दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव. (संस्थापक प्रा.यजुर्वेद महाजन)४विशेष सेवा पुरस्कार : सकिना संदीप बेदी, जागृती अंध मुलींची शाळा, आळंदी, पुणे.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र