नाशिक : येत्या शनिवारी (दि. ७) वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ होत असून शहरातील बाजारपेठ विविध आकर्षक बांधणी केलेल्या भेटवस्तूंनी सजली आहे. सुकामेव्याबरोबरच विविध प्रकारच्या ‘चॉकलेट बॉक्स’चीदेखील क्रेझ बाजारात पहावयास मिळत आहे.चॉकलेटचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध झाले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आक र्षक बांधणी करण्यात आली आहे. खास दिवाळी भेट म्हणून बाजारपेठेत चॉकलेट, एकत्र सुकामेवा ग्राहकांना उपलब्ध आहे. सुकामेवा, चॉकलेटच्या भेटबॉक्सच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्के दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मिठाई विक्रेत्यांकडून दुधाला मागणी वाढली आहे. एकूणच मिठाई व सुकामेव्याला ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. सध्या शहरातील मिठाई विक्रेत्यांकडून दिवसभरात तीनशे ते चारशे लिटर दुधापासून मिठाई तयार केली जात आहे. मिठाई भेट देण्यास नागरिकांची अधिक पसंती दिसत आहे.
मिठाई, सुकामेवा अन् चॉकलेट बॉक्स
By admin | Updated: November 3, 2015 21:29 IST