शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:55 IST

तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने व्यक्त केले.

नाशिक : तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने व्यक्त केले.  इंडियन सायकियॅस्ट्रीक सोसायटी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त ‘कट्टा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. चिन्मयने तणाव आणि त्याचा अभिनयातील प्रवास यावर बोलताना तरुणाईला केंद्रस्थानी ठेवत विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. चिन्मयने सांगितले की, तणावाला बळी पडण्यास तंत्रज्ञान जबाबदार असून, याविषयी तरुणाई अनभिज्ञ आहे. यावेळी अभिनय क्षेत्रात कशापद्धतीने तणावाचा सामना करावा लागतो याबद्दलही त्याने सांगितले. नाशिकमधून जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा त्याठिकाणी उत्कृष्ट अभिनय असून चालत नाही, याची जाणीव झाली. कारण येथे केवळ मनोरंजनााच विचार केला जातो. बऱ्याचदा मनाविरुद्ध असलेल्या गोष्टींचा फारसा विचार न करता त्यात वाहून जावे लागते. रिअ‍ॅलिटी शोबद्दलची रिअ‍ॅलिटी तर काही औरच आहे. याठिकाणी तुमच्या भावना विकल्या जातात. गुणवत्तेपेक्षा मसाला मिळावा यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची निर्मात्यांची मानसिकता असते, असेही चिन्मयने सांगितले.  दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताणतणावापासून दूर राहून आयुष्य कसे जगावे याची माहिती सांगणारे एक पथनाट्य सादर करण्यात आले. रेवन जोशी, सारिका आरोटे, मानसी अष्टपुत्रे, करण राणे, अमोल ठाकरे, जागृती फेगडे यांनी हे पथनाट्य सादर केले, तर या पथनाट्याचे दिग्दर्शन आणि लेखन आरुषी बोरकर यांनी केले होते. स्किझोफ्रेनिया नेमका काय आजार आहे, त्याची लक्षणे काय आहेत, त्यावर उपचार कशापद्धतीने केले जातात याविषयी माहिती देणाºया तज्ज्ञ डॉक्टरांची एक क्लिपही यावेळी दाखविण्यात आली. डॉ. हितेश दौंड आणि डॉ. अनुपम भारती यांनी मुलाखत घेतली.दीपिकाही तणावातबॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणही तणावाला बळी पडली. तिने जाहीरपणे याबाबतची कबुली दिल्यानेच यास जणू काही ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले. मात्र तिने याबाबतची कबुली देणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे तणावाला कोणीही बळी पडू शकतो, असेही चिन्मयने सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक