शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

निर्जनस्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:15 IST

नाशिक : शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन स्थळे रामभरोसे असून दिवसेंदिवस ही ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले ...

नाशिक : शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन स्थळे रामभरोसे असून दिवसेंदिवस ही ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर निर्जनस्थळांवर मद्यपींच्या ओल्या पार्ट्या वाढल्या आहेत. टवाळखोरांकडूनही अशा निर्जनस्थळांचा शोध घेत आश्रय घेत महिला, मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला जात असून पोलिसांकडून अशा निर्जनस्थळांकडे मात्र कानाडोळा केला जात असल्याचे बोलले जात आहे. शहरातील पंचवटी, म्हसरुळ, आडगाव, इंदिरानगर, उपनगर, गंगापूररोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निर्जनस्थळांची संख्या अधिक आहे. या पोलीस ठाण्यांची हद्द लक्षात घेता नव्याने विकसित होणाऱ्या कॉलन्यांचा परिसर तसेच मोकळे भूखंड अधिक आहेत. पडीक इमारतींची संख्याही धोकादायक ठरत असून या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून अशा निर्जनस्थळांवर गस्तीदरम्यान फिरणे गरजेचे असताना मात्र अनेकदा ही स्थळे टाळली जातात.

---इन्फो-- ही ठिकाणे धोक्याचीच... गांधीनगरच्या पडक्या इमारती

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर येथील पडक्या शासकीय इमारतींचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. येथील भग्नावस्थेत असलेल्या शासकीय वसाहतींचे अवशेष मद्यपी, जुगाऱ्यांसह नशेबाजांचा ठिकाणा बनला आहे. या वसाहतीजवळच गांधीनगर भाजीबाजार भरतो. तसेच शाळा, टपाल कार्यालय, क्रीडांगणदेखील याच परिसरात आहे.

--- मेरीच्या भग्न इमारती

मेरी परिसरात असलेल्या शासकीय वसाहतीला अवकळा आली असून जवळच झोपडपट्टी असल्याने येथील पडक्या भग्नावस्थेतील इमारतींमध्ये गुन्हेगार नेहमीच आश्रयाला असतात. पोलिसांना मात्र या वसाहतींच्या परिसरात पेट्रोलिंग करण्यास फारसे महत्त्वाचे वाटत नाही.

--- वालदेवीचा नदीकाठ

देवळालीगाव-विहीतगाव परिसरातील वालदेवी नदीचा काठावरील स्मशानभूमी, रोकडोबावाडीकडे जाणारा पूल तसेच वीटभट्टी भागातील भाजीबाजाराचा तळ परिसरात टवाळखोर, मद्यपी, जुगाऱ्यांचा सतत वावर असतो. या निर्जन भागाकडे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

---

रिंगरोडचा परिसर

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीला जोडणारा समर्थ रामदास स्वामी मार्ग, मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील श्री श्री रविशंकर मार्ग, जेजुरकर मळ्यामार्गे जाणारा रिंगरोड परिसरातदेखील रात्रीच्यावेळी टवाळखोर, मद्यपींचा वावर पाहावयास मिळतो. गुन्हेगार प्रवृत्तीचे टारगट या भागात रिक्षा, चारचाकी वाहने आणून दबा धरून असतात.

--

महिला अत्याचाराच्या घटना अशा

वर्ष - विनयभंग -- बलात्कार

२०२०- १४६-- - --- ४४ २०२१- ६२----- ---५६

--- २०१८--- अपहरण- १८२ २०१९--- अपहरण- १९९ २०२०-- अपहरण- १६३ २०२१- अपहरण- ८२

160921\562516nsk_35_16092021_13.jpg

निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे