शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या निर्णयाला उपमहापौरांनी झिडकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:24 IST

स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे.

नाशिक : स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्र्यांचीही शिष्टाई असफल ठरली असून, गिते-फरांदे यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.  शासन अनुदानातून साकारणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी महासभेने भाभानगर येथील जागा देण्याचा ठराव केल्यानंतर स्थानिक नागरिकांसह प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून विद्यमान भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात संघर्ष पेटला आहे. सोमवारी (दि.३०) जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी नागरिकांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन रुग्णालयास जागा देण्यास विरोध दर्शविला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र, पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सदर प्रकरणी वाद मिटल्याचे सांगत महापालिकेने निश्चित केलेल्या जागीच रुग्णालय होणार असल्याचे ठामपणे स्पष्ट केले. त्यामुळे गिते यांना पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा असतानाच वसंत गिते व प्रथमेश गिते यांच्यासह नागरिकांनी रुग्णालयास जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर जागेत रुग्णालय होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिकाही गिते यांनी घेतल्याने सदर प्रकरण मिटण्याऐवजी आणखी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी सदर जागेबाबत निर्णय देऊनही स्थानिक नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते आणि माजी आमदार वसंत गिते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आमदार देवयानी फरांदे यांनी सदरचा प्रकल्प हा आता पक्षाचा असल्याचे सांगत पक्षावर सारी जबाबदारी टाकून दिलेली आहे. त्यामुळे पक्ष नेमक्या या प्रकरणाबाबत कोणती भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागून असणार आहे. रुग्णालय होणार नाहीस्त्री रुग्णालयाच्या जागेचा वाद अद्याप मिटलेला नाही आणि भाभानगर येथे प्रस्तावित रुग्णालय आम्ही होऊ देणार नाही. ज्या जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे तेथे खुशाल रुग्णालय बांधावे. पार्किंगच्या जागेत रुग्णालय होण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.- वसंत गिते,  प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा