शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपआयुक्त पाटील यांची बदली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:35 IST

नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची शासनाच्या गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांचे नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि आयुक्तालय प्रशासन विभागाच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांची ३० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गृह विभागाकडून शुक्र वारी (दि.९) काढण्यात आला.

ठळक मुद्देचौगुले यांची बदली रद्द

नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची शासनाच्या गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांचे नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि आयुक्तालय प्रशासन विभागाच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांची ३० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गृह विभागाकडून शुक्र वारी (दि.९) काढण्यात आला.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पाटील हे मागील पाच वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी परिमंडळ एकचे उपआयुक्त म्हणून सुरूवातीला पदभार स्वीकारला. दरम्यानच्या काळात मनपाची अनधिकृत धार्मिक स्थळे अतिक्र मण हटाव मोहीम, विधानसभा, लोकसभा निवडणुका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा, मराठा क्र ांती मोर्चा, ट्रिपल तलाक विधेयक निषेधार्थ मुस्लीम महिला मोर्चा, सीएए-एनआरसीला विरोध, विविध सण-उत्सव, मिरवणुका अशा विविध महत्त्वाच्या काळात त्यांनी शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त व योग्य नियोजन करत कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुथुट फायनान्स कार्यालयावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर पाटील यांच्याकडे शहर गुन्हे शाखेच्या उपआयुक्तपदाची सूत्रेसोपविली गेली. दरम्यान पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची शासनाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदी मुंबई पोलीस दलातील अधिकारी उपआयुक्त संग्रामसिंह निशानदार यांची काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चौगुले यांच्याकडे असलेला यापूर्वीचा पदभार तूर्तास कायम आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकार