शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

शासकीय योजनांपासून खरे अपंग वंचित

By admin | Updated: June 12, 2014 00:45 IST

नामपूर : अपंग व्यक्ती शासनाच्या सवलतींपासून वंचित आहेत तर खोटे अपंगत्वाचे दाखले घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे

 

नामपूर : जिल्ह्यात बोगस अपंग कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. खऱ्या अपंग व्यक्ती शासनाच्या सवलतींपासून वंचित आहेत तर खोटे अपंगत्वाचे दाखले घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याबाबत चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.अपंग कर्मचाऱ्यांची तपासणी त्रिसदसीय बोर्डाकडून होऊन त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. मात्र येथेही पैसा व वशिल्याच्या जोरावर अपंग नसणाऱ्यांना ही प्रमाणपत्रे मिळाली असून, बऱ्याच कर्मचाऱ्यांनी हुद्याच्या बढत्याही घेतल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बदलांमध्ये सवलतीही घेत आहेत. यामुळे खरे अपंग या सवलतींपासून वंचित राहत आहेत. खरे अपंगत्व सिद्ध करणारे मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असते व ते आॅनलाइन असते मात्र हे प्रमाणपत्र घेणारे आरोग्य खात्यात केवळ निकम (देवळा),अब्बू शेख (सुरगाणा) हे दोघेच आहेत. इतर अनेकांनी त्रिसदस्यीय समितीच्या प्रमाणपत्रावर या सवलती भोगत आहेत. मलेरिया संघटनेचे विलास शेलार व इतरांनी माहितीच्या अधिकारात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपंगत्वाचे लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे व संख्या यांची माहिती मागविलेली असून, या प्रश्नावर नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षण संघटना या सर्व संघटना एकत्रितपणे खऱ्या अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या महिन्यात झालेल्या बदल्यांमध्ये अनेक बोगस प्रमाणपत्र धारण केलेल्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून, केवळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे म्हणून अनेक बोगस अपंग कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यांचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू बैरागी, भट शिंदे, तात्यासाहेब पवार, मलेरिया संघटनेचे विलास शेलार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)