शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:31 AM

देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे.

ठळक मुद्देसौर ऊर्जेवर विविध प्रकारचे संशोधन मित्राच्या उद्योगाच्या नावाने उद्योग

नाशिक : देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. सौर ऊर्जेवर चालणाºया आॅटो रिक्षा तयार करणाºया नाशिकच्या युवकाला या उदासीन यंत्रणेमुळे स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य होत नाही आणि संशोधनही शक्य होत नसल्याने सरकारी भरवशावर काय प्रगती करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अंकुश मागजी असे या युवकाचे नाव! अवघ्या ३२ वर्षांचा या नाशिककर तरुणाने गेल्या पाच वर्षांत सौर ऊर्जेवर विविध प्रकारचे संशोधन करून दुचाकीपासून तीनचाकीपर्यंत इंधनाशिवाय ग्रीन एनर्जीतून धावायला लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक स्तरावर तयार केलेल्या चेतक आणि सौर मित्र या दोन प्रकारच्या १९ रिक्षा विविध राज्यात विकल्या गेल्या आहेत, परंतु त्यासाठी त्याला स्वत:चा कायदेशीर उद्योग मात्र सुरू करता आलेला नसून केवळ मित्राच्या उद्योगाच्या नावाने हा उद्योग किती दिवस करणार? असा प्रश्न अंकुशपुुढे निर्माण झाला आहे. अंकुश मागजी याचे खरे तर तांत्रिक शिक्षण झालेले नाही. पारंपरिक शिक्षण अवघे अकरावीपर्यंत. परंतु तरीही काहीतरी शोध घेण्याच्या आणि धडपड्या वृत्तीमुळे त्याने सौर ऊर्जेवर चालणाºया वाहनांसाठी वाहून घेतले आहे. सातवीत असतानाच एका रिक्षाच्या मागून निघणाºया धुरामुळे इंधनाला वेगळा पर्याय नसेल काय? या प्रश्नाने त्याला अनेक बाबींचा शोध घेण्यास भाग पडले. मग, शोध आणि अभ्यासाअंती ग्रीन पेट्रोल किंवा इंधनाचे अनेक पर्याय पुढे आले. त्यातून त्याने ‘सौर ऊर्जा’ हा विषय निवडला. २०१० मध्ये त्याने सोलर वॉटर हिटर, सोलर एनर्जी या विषयांवर काम केले. त्यांनतर त्यांनी सौर ऊर्जेवर चालणाºया दुचाकींवर काम सुरू केले त्यात त्याला यश आले. आर्थिक तुलनाच केली, तर पारंपरिक दुचाकीपेक्षा पाच रुपयांत ६० किलोमीटर धावणारी हा शोध खूपच क्रांतिकारी ठरू शकतो, असे अंकुशला वाटले. मग त्याने रिक्षांकडे लक्ष पुरवले. साचा तयार करून घेण्याचे काम मित्राच्या उद्योगात करून नंतर जमेल त्या साधनांचा जुगाड करीत त्याने रिक्षा तयार केली. त्यासाठी खास आकाराची पॅनल्सलाही तयार केली. पुढे संशोधनासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागल्यानंतर बॅँक आॅफ महाराष्टÑकडे मदत मागितली. बॅँकेने पाच लाख रुपयांचे साहाय्य केले, जे पुरसे नव्हते परंतु तरीही त्यातून बरेच काम झाले. प्रयोग यशस्वी ठरल्यांनतर २०१४ मध्ये त्याने केंद्र सरकारकडे उद्योगासाठी अर्ज केला. ९ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याला उद्योग परवाना मिळाला आणि १ मार्च २०१६ रोजी त्याने पहिली रिक्षा रस्त्यावर आणली. स्थानिक पातळीवर रिक्षाचालकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने आॅनलाइनवरून विक्रीची व्यवस्था केली. त्याला बाहेरील राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आणि विशाखापट्टणमचा एक ग्राहक मिळाला. पुढे एकेक करीत तब्बल १९ रिक्षांची विक्री झाली असून, त्यात विशाखापट्टणमबरोबरच कोलकाता, विजयवाडा, अहमदाबाद येथील ग्राहकांनी प्रतिसाद दिला.