शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

१६ उमेदवारांची अनामत रक्कम झाली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:33 IST

नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या १८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कमदेखील वाचविता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाºया समीर भुजबळ यांचा अपवाद वगळता इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.

नाशिक : नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या १८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कमदेखील वाचविता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाºया समीर भुजबळ यांचा अपवाद वगळता इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा निवडणूक शाखेने काढले आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैधमतांच्या एकषष्ठांश मते न मिळाल्यास उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. या नियमानुसार एकूण १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवरांचादेखील समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात दि. २३ रोजी झालेल्या मतमोजणीत वैध मतांची संख्या ११ लाख १४ हजार २५२ इतकी आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे विजयी झाले आहेत, तर राष्टÑवादीच्या समीर भुजबळ यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. अन्य उमेदवारांना मात्र वैधमतांच्या एकषष्ठांश म्हणजेच १ लाख ८५ हजार ७०९ मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम सरकार जमा करण्यात आली.निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅड. वैभव शांताराम अहिरे (५७१९), सोनिया रामनाथ जावळे (६९५२), पवन चंद्रकांत पवार (१,०९,९८१), विनोद वसंत शिरसाठ (१३६२), शिवनाथ विठोबा कासार (८६६), संजय सुखदेव घोडके (८९९), शरद केरू अहेर (१३८७), प्रकाश गिरीधर कनोजे (९२२), सिंधूबाई रवींद्र केदार(१७३६), अ‍ॅड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे(१,३४,५२७), देवीदास पिराजी सरकटे (४२७४), धनंजय अनिल भावसार (१८८५), प्रियंका रामराव शिरोळे (२२०६), विलास मधुकर देसले (३८२६), शरद दामू धनराव (८३५), सुधीर श्रीधर देशमुख (१८८१) यांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे.१४ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदानया निवडणुकीत ६९८० इतके नोटाला मतदान झालेले आहे. निवडणूक रिंगणातील १४ उमेदवार असे आहेत की त्यांना नोटा पेक्षाही कमी मतदान झालेले आहे. भारतीय ट्रायबल पार्टीच्या सोनिया जावळे यांनाच फक्त ६,९५२ म्हणजे नोटाच्या जवळपास मते मिळाली आहेत. अन्य उमेदवारांना ८०० ते ४ हजारापर्यंतच मते मिळाली.तीन लाखांची रक्कमनाशिक लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठीची अनामत रक्कम भरलेली आहे. १२ हजार ५०० आणि २५,००० याप्रमाणे उमेदवारांनी अनामत रक्कम भरलेली असून, जप्त करण्यात आलेली रक्कम ३ लाख २५ हजार इतकी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक