छावणी पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप उर्फ जांग्या बापू सूर्यवशी, देवा दादाजी मेहंदळे, दोघे रा. टेहरे, ता. मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोहमद अतहर मोहमद अकील, मुस्लीमनगर मालेगाव, मोहमद मुर्तुझा अब्दुल रशिद, कमालपुरा, मालेगाव यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ५६ (१) (ब) नुसार हद्दपारीचा प्रस्ताव पोलिसांनी सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावानुसार प्रदीप उर्फ जांग्या बापू सूर्यवंशी व देवा दादाजी मेहंदळे, टेहरे यांना नाशिक जिल्ह्यातून, तसेच सरहद्दीवर असलेल्या धुळे, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांतून दोन वर्षे, तर मोहमद मुर्तुझा अब्दुल रशिद रा. कमालपुरा, मालेगाव यास नाशिक जिल्ह्यातून, तसेच नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शर्मा यांनी दिली आहे.
मालेगावातील चार संशयितांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST