शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी होणार प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:31 IST

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी (दि. ३०) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही पालखीने प्रस्थान होणार आहे.

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी (दि. ३०) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही पालखीने प्रस्थान होणार आहे.पालखी दिंडी प्रस्थानाच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासून संपूर्ण त्र्यंबकेश्वर गाव परिसरातील नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांनी फुलून गेलेले असते. मंदिरात अभंग, कीर्तन, भजन, भारुड आदी कार्यक्रमांनी मंदिर गजबजून जाते. तथापि पालखी प्रस्थान होऊन १६ दिवस होऊन गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायी दिंडीने जाण्यास महाराष्ट्र शासनाने मनाई केली. यास्तव येत्या मंगळवारी, आषाढ शु. १० रोजी परिवहन महामंडळाचा शिवशाही बसने पालखी प्रस्थान होणार आहेत्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) किंवा ज्येष्ठ व. १ रोजी आपल्या दिंडी परंपरेप्रमाणे पालखी प्रस्थान होत असते. पण यावर्षी पायी दिंडी सोहळा रद्द झाल्याने शिवशाही बसने जवळपास २० ते २५ वारकरी पंढरपूर येथे निघणार आहेत.मंगळवारी सकाळी १० वाजेपूर्वी पूजा, अभंग, भजन म्हणून पालखी शिवशाहीत ठेवण्यात येणार आहे. नंतर बसचे प्रस्थान होईल. मग बसमध्येच भजन, अभंग व कीर्तनदेखील होईल. पालखी जाण्यास अवघे तीन दिवस उरले असले तरी मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे