शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

मनविसेचा विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फेºयांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, तातडीने बसफेºयांची कपात थांबवावी, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आगारातील विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजीने कार्यालय दणाणून सोडले.

नाशिक : महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फेºयांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, तातडीने बसफेºयांची कपात थांबवावी, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आगारातील विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजीने कार्यालय दणाणून सोडले.  एकीकडे महामंडळाच्या नाशिक परिवहन विभागाकडून शहर वाहतुकीच्या बसफेºयांमध्ये कपात केली जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून मासिक सवलतीचे प्रवास पासचे दर आकारले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पैसे भरूनही बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामंडळाने तातडीने विविध शाळा-महाविद्यालयांच्या मार्गावरील बसफेºया मुबलक प्रमाणात सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी, या मागणीसाठी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी एन. डी. पटेल रस्त्यावरील आगारातील विभाग नियंत्रकांच्या कार्यालयावर मंगळवारी (दि.२८) हल्लाबोल केला. हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा देत आगारात प्रवेश केला. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या बसेसवर चढून काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या....अन् कार्यकर्ते झाले आक्रमक विभाग नियंत्रक शहराबाहेर दौºयावर असल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्त्यांनी आगारामध्ये उभ्या असलेल्या बसेसवर चढून आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजी करत परिवहन मंत्र्यांसह विभाग नियंत्रकांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदविला. विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या दिला. ‘खुर्चीला निवेदन चिकटवू नका’ कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटविण्याची तयारी सुरू करताच वाहतूक अधीक्षक दालनात आले. ‘थांबा, निवेदन मी स्वीकारत आहे, खुर्चीला चिकटवू नका...’ असे सांगून कार्यकर्त्यांना शांत केले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, संदीप भवर, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, दीपक चव्हाण, कौशल पाटील, तुषार भंदुरे आदींच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. येत्या दोन दिवसात पुन्हा शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

टॅग्स :StrikeसंपMNSमनसे