शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

देवळा : तालुक्यात काही भागात केवळ रिमझिम

By admin | Updated: August 8, 2016 23:17 IST

पोळ कांद्याच्या लागवडीस प्रारंभ

देवळा : नाशिक जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होऊन नद्या-नाले दुधडी भरून वाहत असताना देवळा तालुक्यात खामखेडा, विठेवाडी, भऊर आदि गावांचा अपवादवगळता पावसाचे प्रमाण तसे कमीच आहे. कांदा लिलावासंदर्भात व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये योग्य तोडगा निघत नसल्यामुळे चाळींमध्ये साठविलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा आता सडण्यास सुरुवात झाल्याने मोठा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, तालुक्यातील अत्यल्प पावसाचा लाभ घेत तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर पोळ कांद्याची लागवड सुरू झाली आहे.शासनाने अडतबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केले होते. पण नंतर व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये लिलावासंदर्भात गोणी पद्धतीवरून वाद निर्माण झाला. अद्यापपर्यंत त्यावर योग्य तोडगा निघू शकणार नाही. दरम्यान महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लिलाव होऊ शकले नाहीत. तुरळक शेतकऱ्यांनी गोणी पद्धतीने आपला कांदा विक्रीसाठी आणला; परंतु या गोणी पद्धतीत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत असल्याने शेतकरी या पद्धतीला प्रखर विरोध करीत आहेत. यामुळे हजारो क्विंटल कांदा चाळींमध्ये पडून असल्याने शेतकरीवर्ग आगामी खरिपातील पोळ कांदा लागवडीकडे फारसा उत्साह दाखविणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु देवळा तालुक्याच्या पूर्वभागातील मेशी, दहिवड, डोंगरगावपासून रण्यादेवपाडे, विजयनगर, महालपाटणे, उमराणे आदि गावांमध्ये पोळ कांद्याची लागवड सुरू झाली आहे. पोळ कांद्याची रोपे लागवड योग्य झाल्याने ती खराब होऊन वाया जाऊ नयेत यासाठी कांदा लागवड शेतकऱ्यांना करावी लागत असून, या लागवडीसाठी येणऱ्या खर्चासाठी भांडवल उभे करताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कांदा लिलाव प्रचलित पद्धतीने केव्हा सुरू होतात याकडे नजरा लाऊन बसले आहेत.