शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बाधित सापडल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:18 IST

देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, भविष्यात कोरोना रुग्णात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, भविष्यात कोरोना रुग्णात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यात आठवडाभरातच २० कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. शहरात आतापर्यंत १५ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले शहरातील ओमनगर, ज्ञानेश्वरनगर, नवीन रोहिदास नगर व निमगल्ली परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्यात आली असून, उर्वरित शहरातही औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख आदींनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन तेथील नागरिकांना सूचना दिल्या. कोरोनासदृश लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांनी त्वरित जि.प. विद्यानिकेतन येथील कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. शहरातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात येऊ नये. शहरात कोरोनाचा संसर्ग इतरत्र पसरू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.- संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, देवळा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य