शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : कांदा विक्रीचे पैसे रोखीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:19 IST

कांदा विक्रीचे पैसे धनादेशाऐवजी २४ तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

देवळा : कांदा विक्रीचे पैसे धनादेशाऐवजी २४ तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सभापती बापू देवरे, संचालक मंडळ, व व्यापायांनी निर्णय घेतल्यावर सोमवारी सुरू झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ५५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. त्यात कांद्याचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकºयांनी दिली. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे. उन्हाळी कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून, शेतकरी ह्याच कामात सध्या गुंतले आहेत. मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्यामुळे तयार झालेल्या कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी अव्वाच्या सव्वा मजुरी देऊन कांदे काढण्याची वेळ त्रस्त शेतकºयांवर आली आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.देवळा तालुक्यात कांदा काढणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मध्यंतरी पडलेला पाऊस व वाढलेले उष्णतामान याचा फटका कांद्याला बसून उत्पादनात मोठी घट झाली आहे. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करीत आहेत. यासाठी ज्या शेतकºयांकडे कांदा साठवणुकीसाठी चाळी नाहीत ते तात्पुरत्या चाळी उभारून कांदा साठवणूक करीत आहेत. आर्थिक अडचणींमुळे मिळेल त्या भावात अनेक शेतकयांना  कांदा विकण्याची वेळ आली असून, त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

टॅग्स :onionकांदा