शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:11 IST

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना राज ठकारे यांच्याकडे सूत्रे होती. त्यावेळी हा प्रकल्प साकारण्यात आला होता. मात्र नंतर त्याला अवकळा येत गेली. अशावेळी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांची समर्थकांनी वेळोवेळी केली. परंतु २०१२ मध्ये मनसेची सत्ता पालिकेत येऊनही या प्रकल्पात पाच वर्षांत कोणतीही सुधारणा होऊ शकली नाही. केटीएचएम कॉलेजचे बोटक्लबपासून सुमारे चार ते साडेचार किलोमीटर लांबीचा गोदापार्क साकारण्यात आल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी नदीपात्रालगत गॅबियन वॉल बांधण्यात आली आहे. तथापि, दर पावसाळ्यात हा पार्क पुराच्या पाण्याखाली जातो. त्यानंतर त्याची काही प्रमाणात डागडुजी केली जाते. गेल्या काही वर्षात तर गोदापार्कची अधिक दुरवस्था झाली असून, आता तर गोदापार्कच खचायला लागला असून, रस्ते दुभंगू लागल्याने धोका निर्माण झाला आहे. या पार्कच्या खालून जाणारे गटारीचे पाणीदेखील धोकादायक आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी मुरते. त्यामुळे हळूहळू हा भाग खचू लागला आहे. भविष्यात पूर्ण पार्कच ढासळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूररेषेचा विचार करून महापालिकेने गोदापार्क ढासळू नये यासाठी गॅबियन वॉल बांधली आहे.दगडावर दगडे ठेवून जाळीने ही वॉल तयार करण्यात आली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षे ही गॅबियन वॉलच वाहून जाते असा अनुभव असल्याने आताही गोदापार्क ढासळत असताना ही भिंत त्याला कितपत रोखू शकेल याविषयी शंका आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका