शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दंतवैद्यकशास्त्राला हवी आधुनिकतेची जोड : डॉ. सुरेश मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:58 IST

व्यासपीठावर डॉ. गिरीश नगरकर, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश रोरा, डॉ. रुपेश दुग्गड, डॉ. महेश देवरे, नाशिक चे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उमेश महाजन आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागाच्या परिषदेचे आयोजन दंतवैद्यकशास्त्रही वेगाने प्रगती करत आहेआधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत पद्धतींचा अवलंब करावा

नाशिक : काळानुरूप समाजात दंतविकार व मुखरोग वाढीस लागत आहे. याला बदलती जीवनशैली व आहारशैली कारणीभूत ठरत आहे; मात्र आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान विकसित होत असल्याने दंतवैद्यकशास्त्रही वेगाने प्रगती करत आहे. दंत वैद्यकांनी आपल्या दैनंदिन सरावात डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशनचे महाराष्टप्रदेश अध्यक्ष डॉ. सुरेश मेश्राम यांनी केले.इंडियन डेंटल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी (दि.१) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मेश्राम बोलत होते. व्यासपीठावर डॉ. गिरीश नगरकर, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश रोरा, डॉ. रुपेश दुग्गड, डॉ. महेश देवरे, नाशिक चे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उमेश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी मेश्राम म्हणाले, दंतवैद्यकशास्त्र आधुनिक होत असून, वेगाने प्रगती करत आहे. यामुळे दंत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीदेखील त्यानुसार स्वत:ला अद्ययावत करण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन आयडीएच्या वतीने अशा पद्धतीच्या परिषदेचे आयोजन करण्यावर भर दिला जातो. या परिषदेमध्ये सहभागी तज्ज्ञांकडून प्रगत व आधुनिक दंतवैद्यकशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेतून डॉक्टरांचे ज्ञान अद्ययावत होऊन आधुनिक उपचारपद्धतींद्वारे समाजाला गुणवत्तापूर्ण सेवा देता येण्यास मदत होईल.उद्घाटन सत्रात डॉ. अजित शेट्टी, डॉ. विशाल गुप्ता, डॉ. मंदार पिंप्रीकर यांनी अनुक्रमे फुल माऊथ रिहॅबिलिटेशन, कम्पोसिट रिस्टोरेशन, प्रिडेक्टिेबल इनडॉन्टिक्स या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेच्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामुग्री व साहित्य-वस्तूंचे प्रदर्शन मोफत मांडण्यात आले होते. या परिषदेला उत्तर महाराष्टÑातून सुमारे पाचशेहून अधिक दंतवैद्यकांनी सहभाग नोंदविला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा नाशिक शाखेला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाला.

टॅग्स :Nashikनाशिकtechnologyतंत्रज्ञान