शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

डेंग्यू; आजपासून अ‍ॅक्शन

By admin | Updated: September 29, 2016 00:56 IST

‘आरोग्य’ची महापौरांकडून झाडाझडती : डास निर्मिती करणाऱ्या मिळकतींना नोटिसा

नाशिक : शहरात डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर या विषयावरून राजकीय वातावरण पेटू लागले आहे. त्यामुळे सत्तारूढही जागरूक झाले असून महापौरांनी तातडीने बैठक घेऊन आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. डेंग्यू डासाची निर्मिती करणारे तळघर असो अथवा अन्य सरकारी मिळकती त्यांना तातडीने नोटिसा देऊन कारवाई करा, अशा कडक सूचना महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारपासून धडक मोहिमा सुरू करण्यात येणार आहेत.शहरात संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात असून २५ दिवसांत १८५ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या सर्वच भागात डासांचा उपद्रव वाढला असून मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने अधिकृत आकडेवारी जाहीर करताच शिवसेनेने सत्तारूढ गटावर तोंडसुख घेतले, तर राष्ट्रवादीनेही आरोग्य विभागाला फैलावर घेतले. डेंग्यूचा राजकीय डंख बसल्यानंतर बुधवारी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील आरोग्याची स्थिती जाणून घेताना अनेक धक्कादायक बाबीही चर्चेत आल्या. शहरातील काही मिळकती आणि विशेष म्हणजे काही नगरसेवकांशी संबंधित मिळकतींच्या तळघरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थळे असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाच्या आगारासह, नाशिकरोड येथील नोटप्रेस आणि अन्य शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना सांगूनही दखल घेतली जात नाही, संशयित डेंग्यू रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी केली.एसटीच्या टायर्समध्ये डासांची उत्पत्ती स्थानेशहरात खासगी मिळकतींप्रमाणेच सरकारी कार्यालयांमध्ये अस्वच्छतेमुळे डास निर्मिती होत आहे. पंचवटी विभागात एसटीच्या आगारात टायर्समध्ये पाणी साचून डास निर्मिती होत असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेऊन सांगूनही उपयोग झाला नाही. तर नाशिकरोड येथे सीएनपी आणि आयएसपी प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साचले असून प्रेस व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले.कर्मचाऱ्यांना तंबीमहापालिक ा कर्मचाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवरच महापौरांनी नाराजी व्यक्त केली. डास निर्मूलन करणाऱ्या ठेकेदाराकडे असलेले कर्मचारी युनियन करतात वगैरे विषयांवर चर्चा झाली. त्यावर महापौरांनी कोणीही कर्मचारी असो, त्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.