शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:48 IST

सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाण्याची डबकी साचली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येथील प्रभाग क्रमांक २८मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाण्याची डबकी साचली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येथील प्रभाग क्रमांक २८मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.सिडको प्रभाग २८मध्ये नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक मटाले, सुवर्णा मटाले यांनी दीपावलीनिमित्त प्रभागात फिरून नागरिकांना भेडसावणाºया नागरी समस्यांबाबत पाहणी करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच प्रभागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्या आढळून आल्याने याबाबत नगरसेवकांनी महापालिकेला कळविले.प्रभागात ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला असल्याने त्याची मनपाने त्वरित मार्गी लावण्यात यावे याबाबत सांगितले. प्रभागातील शुभमपार्क, गौरव कॉलनी या भागांतील अंबड लिंकरोडमधील विविध वसाहतींना यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी भेटी देऊन तसेच प्रभाग स्वच्छ ठेवावा याबाबतही नागरिकांना आवाहन केले.दरम्यान, सिडकोतील उत्तमनगर, पवननगर आदी भागांत डासांचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणी तसेच धूर फवारणी करण्यात यावी, अशी सिडको परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे. धूर, औषध फवारणीची गरजप्रभागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रूग्ण आढळले असून, ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे. परंतु याबाबत मनपाकडून दखल घेतली जात नसल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. मनपाने नियमित धूर व औषध फवारणी करण्याची गरज असल्याचेही यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले.दिवाळीचा सण असल्याने घरोघरी साफसफाई केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. परंतु अनेक भागांत घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने काहीजण रस्त्यालगतच कचरा टाकतात.