शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभोण्यात दोघांना डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:03 IST

कळवण तालुक्यातील अभोणा येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम व जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, डेंग्यूचे डास उत्पत्तीचे जवळपास २५ ते ३० ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देदुर्लक्ष : आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम

नाशिक : कळवण तालुक्यातील अभोणा येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम व जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, डेंग्यूचे डास उत्पत्तीचे जवळपास २५ ते ३० ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.तीन ते चार दिवसांपूर्वी अभोणा ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या रुग्णांच्या रक्त तपासणीतून त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे लक्षात आल्याने आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेतली. यंदा अभोणा व परिसरात जोरदार पाऊस झाला असून, पावसाचे पाणी अजूनही जागोजागी साचलेले आहे. त्यातच अभोण्याच्या खडकाळ भूभागावर जागोजागी डबके कायम आहेत.सदरची बाब लक्षात येताच, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, डॉ. रवींद्र सपकाळे, डॉ. सिद्धू आदींनी अभोणा येथे धाव घेऊन ग्रामपंचायतीत सरपंच व नागरिकांची बैठक घेऊन डेंग्यूविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण गावात डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांचा शोध घेण्यात येऊन सुमारे २५ ठिकाणे नष्ट करण्यात आली. दोन दिवसांपासून गावात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करीत असून, त्यात नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही.नागरिकांनी घराच्या गच्चीवर तसेच आवारात पिंप, टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलेले आहे. अशा स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची अंडी व अळ्यांचा उपद्रव वाढला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढले असून, हा काळ डेंग्यूच्या डासाच्या उत्पत्तीसाठी अनुकूल आहे. त्यातूनच अभोण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढीस लागली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू