शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या फिती लावून कामकाज तहसीलदारांची निदर्शने : पोलीस संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:34 IST

गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.

ठळक मुद्देवाळू माफियांनी पथकावर हल्ला चढविलावाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली

नाशिक : गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कुकडी नदी पात्रात होणाºया अवैध गौणखनिज वाळू उत्खननास तहसीलदार भारती सागरे व त्यांच्या पथकाने अटकाव केला असता, वाळू माफियांनी या पथकावर हल्ला चढविला तसेच तहसीलदारांच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घटना महाराष्टÑात सातत्याने घडत असून, या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यापलीकडे शासनाकडून कोणताही ठोस व धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही, परिणामी वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली व त्यातून हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. गौण खनिज प्रतिबंधक पथकाला सशस्त्र पोलीस संरक्षण पुरविण्याचे शासनाने मान्य केले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अधिकाºयांचे मनोधैर्य खचू लागले आहे. शासनाने आता तरी पारनेरच्या घटनेची दखल घ्यावी व माफियांविरुद्ध कडक कारवाई करावी अन्यथा २७ जानेवारीपासून राज्यातील महसूल अधिकारी गौणखनिज प्रतिबंधाची कार्यवाही करणार नाहीत, असा इशारा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे. यावेळी तहसीलदार शरद घोरपडे, चंद्रकांत देशमुख, प्रशांत पाटील, सुचेता भामरे, देवगुणे, नवनीत सुसलादे, पंकज पवार, विठ्ठल मोराणकर, राजेंद्र शेवाळे, राजेश मोरे आदी उपस्थित होते.