शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीबाधित शेतकऱ्यांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:30 IST

सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली.

ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यात येण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी.

सिन्नर, दि. 10-  प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यात येण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर गुरूवारी सुमारे दोन तास निदर्शनं केली.

समृद्धीबाधीत १० जिल्ह्यातील ३३ तालुक्यातील शेतकरी मुंबई येथे गुरुवार (दि. १०) रोजी मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या १० जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शनं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून समृध्दीबाधीत गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृध्दी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या.

समृध्दी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृध्दी महामार्ग रद्द करा, जमिन आमच्या हक्काची; नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.