शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:14 IST

ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचे व सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते

ठळक मुद्देबिल राज्याकरिता, वीजग्राहक, शेतकरी, सामान्य जनतेच्या हिताचे नाही काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवून काळा दिवस

नाशिक : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.

ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचेसरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते सर्व अधिकार केंद्र सरकारच्या पातळीवर करण्याचे प्रावधान आहे. हे बिल राज्याकरिता, वीजग्राहक, शेतकरी, सामान्य जनतेच्या हिताचे नाही. या कारणास्तव देशातील वीज कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी सोमवार, दि.१ जून रोजी या बिलाला विरोध करत ते बिल रद्द करण्याच्या मागणीकरिता काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवून काळा दिवस पाळला. नाशिकरोड येथील विद्युत भवनसमोर सोमवारी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून काळा दिवस पाळला. यावेळी वर्कस फेडरेशन, इंजिनिअर असोशिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार काँग्रेस आदी संघटनाचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, महेश कदम, अतुल आगळे, सतीश पाटील, राजू नागपुरे, भास्कर सातव आदी सहभागी झाले होते.(फोटो ०२ वीज) प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ निदर्शने करताना व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, महेश कदम, अतुल आगळे, सतीश पाटील, राजू नागपुरे, भास्कर सातव आदी.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक