शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गणेशोत्सवकाळात गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:33 IST

सिन्नर : ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, शिवरायांच्या विचारांची जपणूक व्हावी तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळावा, या उद्देशाने मोहदरी येथील ब्रेव्हझ इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये चिमुकल्यांसाठी गडकिल्ले बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिवकाळाशी एकरूप होत पाच दिवसांच्या परिश्रमानंतर आकारास आलेल्या या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गणेश स्थापनेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे प्रदर्शन पालकांसह इतर शाळांनाही खुले करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाळी माती, बारदान, लाकूड, रद्दी पुठ्ठे, कागद आदी वस्तूंचा वापर

सिन्नर : ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, शिवरायांच्या विचारांची जपणूक व्हावी तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळावा, या उद्देशाने मोहदरी येथील ब्रेव्हझ इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये चिमुकल्यांसाठी गडकिल्ले बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिवकाळाशी एकरूप होत पाच दिवसांच्या परिश्रमानंतर आकारास आलेल्या या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गणेश स्थापनेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे प्रदर्शन पालकांसह इतर शाळांनाही खुले करण्यात आले आहे.थर्माकोल किंवा अन्य पर्यावरणास घातक असलेल्या वस्तूंना दूर सारत पर्यावरणपूरक वस्तूंपासून किल्ले बनविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक स्नेहा वाणी यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काळी माती, बारदान, लाकूड, रद्दी पुठ्ठे, कागद आदी वस्तूंचा वापर करून शालेय वेळेत तब्बल चार दिवस परिश्रम घेत रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड हे चार किल्ले साकारले. रंगकामासाठी फळे, फुले आणि पानांचा उपयोग करण्यात आला.याशिवाय छत्रपती शिवरायांचा शासन दरबार देखावा, शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आदी प्रतिकृतीही साकारल्या. गडाची तटबंदी, बुरु ज, मुख्य दरवाजा, राजाचा दरबार, खलबतखाना, शस्त्रागार, धान्याची कोठारे, बाजारपेठा, घोड्याची पागा, राणीचा महल आदी बारकावे विद्यार्थ्यांना या नवनिर्मितीच्या निमित्ताने शिक्षकांकडून माहिती झाले. प्रत्येक गडाची महती, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची जाणीव, त्यासाठी उपसलेले कष्ट, लढलेल्या लढाया यांचीही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रदर्शन बघणाऱ्यांनाही या किल्ल्यांची माहिती आणि महती कळावी यासाठी प्रत्येक किल्ल्याजवळ माहितीफलक लावण्यात आले आहेत.शालेय वेळेत सकाळी १० ते दुपारी १ या काळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. ब्रेव्हझ स्कूलचे अध्यक्ष व्हिनस वाणी, संचालक स्नेहा वाणी, समन्वयक मोहिनी कुंभारे यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेले गडकिल्ले बघून त्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. गडकिल्ल्यांची कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक मीनल येवलेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका ऋतिका मुळे, वैशाली मोहदवे, मानसी तांडेल आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.