शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.समृद्धीबाधित दहा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतील शेतकरी मुंबई येथे गुरुवारी (दि. १०) मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या दहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून समृद्धीबाधित गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृद्धी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या. समृद्धी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृद्धी महामार्ग रद्द करा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा’, अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिकारी शासनाची दिशाभूल करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी केला. पर्यायी मार्ग असताना शासन आडमुठे धोरण घेत असून, यामुळे बागायती क्षेत्रासह अनेक शेतकºयांच्या घरावर नांगर फिरणार असल्याने शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी अंबादास वाजे यांनी केली. शेतकºयांनी एकजूट दाखवून यापुढेही लढा सुरू ठेवावा, असे आवाहन वाजे यांनी केले. राधेश्याम मोपलवार यांनी शेतकºयांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी तानाजी तुपे यांनी केली. सदर प्रकल्प म्हणजे हत्ती असून, तो पोसणे अवघड असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती शांताराम ढोकणे यांनी व्यक्त केले. या महामार्गातून बागायती क्षेत्र टाळावे व पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नामदेव आरोटे, भाऊसाहेब कराड, रत्ना पवार, विमल सातपुते, शीलाबाई पडवळ, रावसाहेब हारक, उत्तम हारक, ज्ञानेश्वर चव्हाणके, दशरथ तांबे, विष्णू सांगळे, रंगनाथ ढोली, पांडुरंग बोडके, विनोद पडवळ, ज्ञानेश्वर काळुंगे, आनंदा काळुंखे, संजय वाजे, दशरथ ढोली, योगेश तांबे, विलास आढाव, विजय दराडे, किरण हारक, संजय वाजे, नवनाथ ढोली, सोपान वाजे, अमोल वाजे, संतोष बर्वे, घमाजी ढोली यांच्यासह सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, दुसंगवाडी, पाथरे, मलढोण, मºहळ, डुबेरे, पाटोळे आदिंसह समृद्धीबाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, दत्तात्रय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.