शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांचे नाशिक  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 14:26 IST

असंघटित औद्योगिक खासगी सहकार अंगीकृत महामंडलातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई.पी.एफ. ९५ ही पेन्शन योजना सुरू केली होती. या योजनेत मिळणा-या अत्यल्प निवृत्तिवेतनासंदर्भात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सरकार सत्तेवर आले तर ९० दिवसांत

ठळक मुद्दे पेन्शनधारकांना चार वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करायेत्या ७ व ८ मार्च रोजी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन

नाशिक : ईपीएफ पेन्शनधारकांना चार वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी, यासाठी जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.यासंदर्भात जिल्हाधिका-यांमार्फत केंद्रीय श्रम व कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असंघटित औद्योगिक खासगी सहकार अंगीकृत महामंडलातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई.पी.एफ. ९५ ही पेन्शन योजना सुरू केली होती. या योजनेत मिळणा-या अत्यल्प निवृत्तिवेतनासंदर्भात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सरकार सत्तेवर आले तर ९० दिवसांत ईपीएफधारकांना तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासाठी दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. जावडेकर यांच्या प्रयत्नानेच स्थापन झालेल्या डॉ. कोशियारी कमिटीने सरकारला अहवाल सादर करून त्यात पेन्शनधारकांना ३ हजार रुपये महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. यासंदर्भात लोकसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात येऊन सरकारने सकारात्मक दर्शविली, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वयोवृद्ध पेन्शनर्स हवालदिल झाले असून, येत्या ७ व ८ मार्च रोजी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.पेन्शनधारकांना साडेसहा हजार रुपये महागाई भत्त्यासह पेन्शन मिळाली, कोशियारी कमिटीचा अहवाल लागू करा, ईएसआयमार्फत देऊ केली जात असलेली आरोग्य सेवा त्वरित सुरू करा, पेन्शन विक्रीची शंभर हप्त्यानंतर ही सुरू असलेली कपात त्वरित बंद करा आदी मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. या आंदोलनात फेडरेशनचे अध्यक्ष राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, सुभाष काकड, चेतन पनेर, विलास विसपुते, बापू रांगणेकर, शिवाजी शिंदे, नारायण आडणे, नामदेव बोराडे, प्रकाश नाईक, शिवाजी ढोबळे, के. एन. कांबळे, एम. भागवत, के. एल. शिरसाठ, श्रीकांत साळसकर, निवृत्ती शिंदे, नईम शेख आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक