शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

चांदोरी येथे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:43 IST

चांदोरी : येथील गोदावरी नदी पात्रात महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनने तयारी पूर्ण करीत प्रांताधिकारी अर्चना पठारे,तहसीलदार दीपक पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निरीक्षक खंडेराव रंजवे,सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके केली.

चांदोरी : येथील गोदावरी नदी पात्रात महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनने तयारी पूर्ण करीत प्रांताधिकारी अर्चना पठारे,तहसीलदार दीपक पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निरीक्षक खंडेराव रंजवे,सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके केली.निफाड तालुक्यातील गोदाकाठ असो किंवा जिल्ह्यातील कोणतेही गाव असो, त्या गावात एखादी आपत्ती घडल्यास तत्परतेने हजर होत आपत्ती व्यवस्थापन समितीकडून बचाव कार्य करण्यात येते. या समितीकडून मॉक ड्रिल तसेच नागरिकांना पूरपरिस्थितीत स्वत:ला वाचवण्यासाठी काय करावे, एखादी व्यक्ती बुडून बाहेर आल्यास त्याच्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत माहिती दिली. तसेच पूर पाण्यात बोट कशी चालवावी, बुडणाºया व्यक्तीला कसे वाचवावे याबाबत प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली.त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या भागात जोरदार पाऊस झाला की, दारणा व गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली की, नदीकाठच्या गावात व शिवारात पाणी शिरते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते व जनजीवन विस्कळीत होते.या महापुरात अनेक लोक पुरात अडकलेले असतात तसेच गावात अन्न धान्य पुरवठा करण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन समितीचे जवान करीत असतात. यावेळी तलाठी निखिल शिरोदे ,सत्यम चौधरी ,शशिकांत चिताळकर , मंडल अधिकारी विनोद काकड ,वाल्मिक गडाख व आपत्ती व्यवस्थापन समितीचे जवान उपस्थित होते.आमची संपूर्ण टीम पूरपरिस्थितीचे काम करण्यासाठी सज्ज असून आम्ही सराव व प्रात्यक्षिके करीत आहोत. फक्त शासनाने आम्हाला पूरपरिस्थिती बचाव कार्यासाठी लागणाºया वस्तू लवकर उपलब्ध करून द्याव्यात.- फकिरा धुळे, सदस्य आपत्ती व्यवस्थापन समिती

टॅग्स :Nashikनाशिक