मालेगाव : येथील ग्रामशक्ती संघातर्फे द्याने चंद्रमनी नगरात जलवाहिनी टाकावी या मागणीसाठी येथील महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. चार वर्षांपासून या परिसरात जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. मनपातर्फे पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना पाण्यासाठी फिरण्याची वेळ येते. या भागात जलवाहिनी टाकावी या मागणीसाठी संघटनेतर्फे मनपावर ४ एप्रिल व २४ आॅगस्ट १५ला मोर्चा काढण्यात आला होता. मात्र तरीही याकडे काणाडोळा करण्यात आला. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात अॅड. चंद्रशेखर देवरे, सिद्धार्थ उशिरे, अलिम शेख, अभिषेक सोनवणे, सोनू वाघ, विजय उशिरे आदि सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)मालेगाव मनपासमोर द्याने येथील चंद्रमनीनगर भागात जलवाहिनी टाकावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करताना ग्रामशक्ती संघाचे पदाधिकारी.
मालेगाव मनपासमोर ग्रामशक्तीचे धरणे आंदोलन
By admin | Updated: January 19, 2016 22:48 IST