शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:55 IST

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भारिप बहुजन महासंघाचा मालेगावी मेळावा

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस व भाजपाने देशातील सत्ता सर्वसामान्यांच्या हातात येवू दिली नाही. म्हणून लोकशाहीवर हल्ला केला जातो. लोकशाहीला कैद करण्याचा प्रकार सुरू आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. कारखाने, व्यवसाय बंद पडले. शासनाला मनुवाद अनायचा आहे. त्यामुळे सावधानतेने पाऊले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.कापड उद्योगाला सवलतीच्या दरात वीज पुरविणे गरजेचे आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या बेलगाम घोड्याला लगाम घालण्यासाठी व संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे जागा वाटपाचा आराखडा मागितला होता. मात्र त्यांनी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. शासनाने हमीभाव जाहीर केला; मात्र त्यासाठीच्या बाजारपेठा व यंत्रणेचा तपास नाही. मागचे सरकार सरळसरळ खात होते. आत्ताचे सरकार चोरांचे सरकार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी शांताराम बोरसे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर ढेपले, दिशा पिंकी शेख, अनिल जाधव, अमित भाईगळ, डॉ. खालीद परवेझ, मौलाना सुफी गुलाम रसूल, प्रा. किसन चव्हाण आदिंची भाषणे झाली. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची तब्बल तीन तास उशिराने सभास्थळी आगमन झाले. त्यानंतरही एक तास इतर वक्त्यांची भाषणबाजी झाली. कार्यकर्त्यांना व महिलांना आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत बसून रहावे लागले.