शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:08 IST

देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.एनएसयूआयच्या राज्य व नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, सदस्य अश्विनी अहेर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिन शेख, नगरसेवक वत्सला खैरे, राहुल दिवे, ममता पाटील आदी उपस्थित होते. प्रणिती शिंदे म्हणाल्या, समाजात सुसंवादाची गरज आहे. पंतप्रधानांच्या भाषणांपेक्षा दोन व्यक्ती, दोन गटांमध्ये होणारा संवाद महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांत हा सुसंवाद हरवला आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील लोकशाही संकटात आली आहे. परंतु तरुणांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व देशाच्या अखंडत्वाला अडचणीत आणू पाहणाºयांविरोधात एकत्रित येऊन देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांना बरोबरीचे स्थान मिळण्याची गरज असून, याची शिकवण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरातूनच मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर करण्याची संधी देऊन मुलांमध्ये आत्मविश्वासाची निमिर्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त के ली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एनएसयूआयचे राज्य सचिव नितीन काकड यांनी, प्रास्ताविक आकाश छाजेड यांनी, तर सूत्रसंचालन लीना शेख यांनी केले.काँग्रेसमधील गट-तट पुन्हा चव्हाट्यावरनाशिक शहर व जिल्ह्यात मरगळ झटकण्याच्या निमित्ताने पक्षांतर्गत युवा ब्रिगेडकडून सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत एनएसयूआयतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातही पक्षांतर्गत असलेले गट-तट दिसून आले. माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्यासह आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे एकत्रितरीत्या सत्कार सोहळ्यात सहभागी झालेले असताना, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या गटाने मात्र या सत्कार सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस