शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:08 IST

ओझरटाऊनशिप : जिल्ह्यातील बंद असलेले आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमदतीपासूनदेखील हे छोटे व्यावसायिक वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कओझरटाऊनशिप : जिल्ह्यातील बंद असलेले आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.गेल्या पाच महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद आहेत. ५ आॅगस्ट २०२० रोजी महाराष्टÑ शासनाने बहुतांशी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु यात आठवडे बाजार सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश शासनाने दिलेले नसल्याने आठवडे बाजार सुरू झालेले नाहीत. आठवडे बाजार हे एकमात्र उपजीविका चालवण्याचे साधन असलेला मोठा किरकोळ विक्रेता वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांसाठी घोषित केलेल्या मदत पॅकेज योजनेचे निकष व माहिती अद्यापपर्यंत या छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्या मदतीपासूनदेखील हे छोटे व्यावसायिक वंचित आहेत. जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्यात यावेत व केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांसाठी घोषित केलेल्या मदत पॅकेजची अंमलबजावणी करणेबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघाच्या वतीने संघाचे पदाधिकारी अनिल रासकर, आर. टी. कदम, बाळासाहेब कळमकर, सुधाकर वाणी यांनी केली आहे.

टॅग्स :MarketबाजारBaazaarबाजार