शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून ठकसेनने लुटले सोने बनवाबनवी : ज्येष्ठ नागरिकांना सरकारी मदत मिळत असल्याची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:28 IST

सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसटाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद दागिने लुटल्याने खळबळ

सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या आई कमरुनिसा रब्बानी शेख यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या त्याच्यावर विश्वास ठेवत कमरुनिसा पुन्हा रिक्षाने घरी गेल्या आणि तीन तोळे सोन्याच्या दागिन्यासह पती रब्बानी गुलाम शेख यांना घेऊन तहसील कचेरीत आल्या. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने रब्बानी शेख यांना तहसील कचेरीत नेले व तुम्ही बाहेरच थांबा असे कमरुनिसा यांना सांगितले.पुन्हा दहा मिनिटांनी तो इसम बाहेर आला व तुमचे दागिने तुमच्या पतीने मागितले असे सांगत तुम्हाला तहसीलमध्ये अधिकाºयांनी विचारल्यावर तुम्ही गरीब आहेत असेच सांगायचे म्हणून निघून गेला; मात्र काही वेळाने रब्बानी शेख तहसील कचेरीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्नीला त्या इसमाबाबत विचारले असता तो दागिने घेऊन फरार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी आठवडे बाजारात गेल्या होत्या. पोलीस चौकीजवळून त्या जात असताना त्यांना एक अनोळखी इसम भेटला. त्याने स्वत:हून कमरुनिसा यांना मुझे पहचाना नही क्या? मै रफिक हाजी का लडका हूं। आप मेरे साथ चलो। सटाणा तहसील कचेरी मे बुढे लोगोंको चालीस हजार रु पये मिल रहे है, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत त्या रिक्षामध्ये बसून तहसीलमध्ये गेल्या. तहसील कचेरीच्या नवीन इमारतीजवळ त्यांना बसवून तो अज्ञात इसम तहसील कचेरीत जाऊन आला. त्यानंतर त्याने कमरुनिसा यांना तुमच्याकडे सोन्याची दागिने आहेत का, असे विचारत असतील तर ते घरून घेऊन येऊ आणि सोबत तुमचे पतीही लागतील तर त्यांनाही घेऊन येऊ असे सांगत याबाबत कोणाला काही सांगू नका असे सांगितले.