शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या बांड्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST

येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे

मानोरी येथे थेट घरपोच आलेल्या उसाच्या बांड्या जनावरांना चारा म्हणून विकत घेताना शेतकरी.मानोरी : येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. येवला तालुक्यातील मुखेड, सत्यगाव, दत्तवाडी, नेऊरगाव, भिंगारे, मानोरी बुद्रुक परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी वर्गाने घेतले असून, मुबलक पाण्यामुळे उसाचा दर्जादेखील चांगल्या प्रमाणात सुधारला असून, सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने या उसाच्या बांड्यांना जनावरांना हिरवा चारा म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.यंदा दुग्ध व्यवसायालादेखील अच्छे दिन आलेले असल्याने यंदा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केले आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना वेळेवर चारा मिळत नव्हता. दोन वर्षांपासून दुधाला १८ ते २० रु पये प्रतिलिटर इतका दर मिळत होता. यातून दुधाचा उत्पादन खर्चदेखील फिटणे कठीण होऊन गेले होते. यंदा मात्र चारा मोठ्या प्रमाणात असून, उसाच्या हिरव्या बांड्यांमुळे दुधाला अच्छे दिन आले आहेत. त्यात ढेपीचेदेखील दर कमी झाले असल्याने सध्या दुधाला सरासरी ३४ रुपये प्रतिलिटर इतका उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे मुखेड येथे हिरव्यागार बांड्या घेण्यासाठी दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. मानोरी, खडकीमाळ, देशमाने, भिंगारे, सत्यगाव, वाकद, नेऊरगाव, शिरवाडे आदी गावांतील शेतकरी वर्ग आपल्या गायींना उसाच्या हिरव्या बांड्या घेण्यासाठी येत असतात. ऊसतोड कामगार दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ऊस तोडून उसाच्या ट्रक भरून दिल्यानंतर उसाच्या बांड्या विकण्यासाठी गावोगावी फिरत असतात. उसाच्या बांड्यांना सध्या शंभर रुपये शेकड्याप्रमाणे दर मिळत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र