शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:17 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. अनेकांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने परिसरातील गावे-वाड्या-पाड्यांमध्ये मनरेगाची तसेच जलसंधारणांची कामे हाती घ्यावीत आणि मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.दरवर्षी मजुरांचे स्थलांतर हे केवळ तालुक्यात कामे नसल्या मुळेच होत असते. दिवाळी नंतर हे स्थलांतर होउन साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हे स्थलांतरित मजूर दोन पैसे गाठीला घेऊनच परत येत असतात. याच पैशातून खरीप लागवडीचा प्रश्न सुटत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनलाच शिवाय, जवळ एकही पैसा नसताना उपाशी तापाशी आपली कच्चीबच्ची खांद्यावर घेउन पायी परत माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. मुंबई, गुजरात, ठाणे, कल्याण आदी भागातून त्र्यंबक तालुक्यातील स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतले आहेत. गावातही कामे नसल्याने त्यांच्यावर हाताला घडी बांधून बसण्याची वेळ ओढवली आहे.---------------------------------तालुक्यातील गावे, वाड्या-पाडे येथील जलसंधारणेची कामे (उदा.) विहिरी, गावतलाव, शेतीचे बांधबंदिस्ती, खड्डे खोदणे, कच्चे रस्ते तयार करणे, रस्त्यालगत गटार खोदणे या कामांना सुरुवात करावी. पाण्याचा स्रोत शोधून विहीर खोदकाम करणे, शेततळे ही कामे प्राधान्यने सुरू केल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या संबंधी निवेदन तहसीलदारांना दिले आहे. त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा.- रघुनाथ घाटाळ, सदस्य, ग्रामपंचायत, मुलवड

टॅग्स :Nashikनाशिक