शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 18:31 IST

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी शहर, जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे भाजप सरकारविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून गांधी परिवाराला पुन्हा एसपीजी सुरक्षा  कवच प्रदान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देएसपीजी सुरक्षा काढल्याने गांधी परिवाराच्या सुरक्षेला धोकाकाँग्रेसच्या नेत्याची सुरक्षा केंद्र सरकारकाने धोक्यात आणलीनाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचा केंद्र सरकारवर आरोप

नाशिक : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी शहर, जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे भाजप सरकारविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून गांधी परिवाराला पुन्हा एसपीजी सुरक्षा  कवच प्रदान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.केंद्र सरकाने गांधी परिवारातील सदस्य तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे एसपीजी (विशेष सुरक्षा दल) सुरक्षा काढून घेतल्याने देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सरकारवर टिकेची झोड उठविली असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सोमवारी नाशिकमध्येही पाहायला मिळाले. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीकेंद्र सरकारच्या  निर्णयाविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जगभरात शत्रू राष्ट्रांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना संपवण्याचा डाव काही शत्रू आखत असून यातूनच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्या हत्या झाल्याचा पूर्व इतिहास असताना गांधी परिवाराचे सुरक्षा कवच काढून के द्र सरकार त्यांची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोपही काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांची काढलेली ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रदान करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसच्या नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे  जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सरचिटणीस चारुशीला काळे, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, स्विकृत सदस्य पोपटराव नागपुरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष हनीफ बशीर, सरचिटणीस सुरेश मारु, निलेश  खैरे, उद्धव पवार,  कैलास कडलग, विजय पाटील, मोहन करंजकर, ज्युली डिसुझा, कुसुम चव्हाण, रामकिसन चव्हाण, अण्णा मोरे, सचिन दीक्षित, राजकुमार जेफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी