सटाणा : बागलाण तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तळवाडे भामेर पोहोच कालवा कामास गती देऊन हे काम यावर्षी पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव निकम यांच्यासह ग्रामस्थानी केली आहे.हरणबारी धरणाच्या पूर पाण्याने पाझर तलाव व तळवाडे भामेर इरिगेशन टँक भरण्यासाठी अंतापूर गावाजवळील मोसम नदीवरील कठगड बंधाऱ्यापासून तळवाडे भामेर पोहोच कालवा १२ वर्षांपासून मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत कठगड बंधाऱ्यापासून पाच किमी लांबीचा अस्तित्वातील कालवा नूतनीकरण व नवीन कालवा काढणे व त्या कालव्याद्वारे तांदुळवाडी, जुनवणे, शडी पिसोळ, एकलहरे पाझर तलाव व कोल्हापूर बंधारे व तळवाडे भामेर इरिगेशन टँक भरणे आदि नियोजन आहे. या कॅनालच्या कामावर ५.४८ कोटी रुपये खर्च होऊनही व २०१३-१४ आर्थिक वर्षात रु. ४.४० कोटी निधी उपलब्ध असून, ही हे काम गत दहा वर्षांपासून मंदगतीने चालू आहे. या कामासाठी सटाणा येथे स्वतंत्र सबडिव्हिजन असूनदेखील उपअभियंता व ज्युनियर इंजिनियरच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे सद्या पुनद धरण प्रोजेक्टकडील उपअभियंत्याकडे या कामाचा तात्पुरता प्रभार दिला आहे. या सबडिव्हीजन स्वतंत्र उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या नेमणुका होणे गरजेचे आहे. गत दहा वर्षांपासून रेंगाळलेले हे काम पूर्ण होऊन सन २०१५ मध्ये हरणबारीचे पूर पाणी या तळवाडे पोहोच कालव्यात टाकावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.मानव अधिकार संघावर मोहसीन शहासटाणा : शहरातील मोहसीन सुलतान शहा यांची आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघाचे उपाध्यक्ष जोसेफ मलबारी यांनी नाशिक येथे शहा यांना नियुक्तीपत्र दिले.( वार्ताहर)या वेळी पालिकेचे माजी नगरसेवक अल्ताफ शेख, शफिक मुल्ला, मुन्ना शेख, सिराज मुल्ला, फिरोज खान आदी उपस्थित होते. (वार्ताहर)