शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
2
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
3
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
4
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
5
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
6
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
7
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
8
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
9
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
10
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
11
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
12
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
13
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
14
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
15
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
16
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
17
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
18
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
19
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
20
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

विद्युत सब स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:21 IST

ब्राह्मणगाव : येथील सबस्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांची गावातील मान्यवरांसमवेत भेट घेऊन लेखी निवेदन दिले. भुसे यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे अभिवचन दिले.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : कृषीमंत्र्यांचे आश्वासन

ब्राह्मणगाव : येथील सबस्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांची गावातील मान्यवरांसमवेत भेट घेऊन लेखी निवेदन दिले. भुसे यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे अभिवचन दिले.या प्रमुख प्रश्नाबरोबरच गावातील शेत शिवारात सिंगल फेज वीज पुरवठा, शेत शिवारात रस्ते, ब्राह्मण गाव - महाल पाटणे गावाला जोडणारा गिरणा नदीवर पुलाचे निर्माण करणे, बुध्द विहार सभामंडप पॅगोडा मंदिर निर्माण आदी कामांबद्दल यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, माजी सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष आहिरे, नवनिर्वाचित सदस्य व मार्केट कमेटीचे माजी सदस्य किरण आहिरे, शिवसेनेचे संदीप आहिरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आर. पी. आय. तालुका अध्यक्ष बापुराज खरे, नवनिर्वाचित सदस्य विनोद आहिरे, नितीन आहिरे, प्रहार संघटनेचे रोशन आहिरे, नवनिर्वाचित सदस्य बापू माळी, दा ढेपले, जनार्धन सोनवणे, शामराव माळी, कैलास आहिरे, पुंजाराम आहिरे, गौरव शिरोडे, रमेश आहिरे, भाऊसाहेब आहिरे, केवळ आहिरे, भगवान आहिरे, समाधान डांगळ आदी मालेगाव येथे उपस्थित होते.या प्रसंगी भुसे यांना ब्राम्हणगावतील प्रलंबित सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील शिष्टमंडळाचे भेटी प्रसंगी वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सानप यांना फोन करून माहिती घेतली व तत्काळ प्रलंबित ब्राम्हणगाव सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले. सानप यांनी येणाऱ्या काळात पहिल काम ब्राम्हणगाव येथील सबस्टेशनच हाती घेऊ असे आश्वासन दिले.याच बरोबर शेतशिवार सिंगल फेज योजना, शेत शिवार रस्ते, महालपाटणे गिरणा नदीवर पुलाच काम इत्यादी कामे मार्गी लावण्यासाठी कृषी मत्र्यांना साकडे घातले व या प्रलंबित प्रश्न बाबत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले.